आंबेडकरवाद हे तत्त्वज्ञानच आहे ! Part - I
जगातील अनेक देशात हिंसक मार्गाने किंवा जबरदस्तीने घडवून आणलेल्या व नंतर फसलेल्या समाजवादी कांतीचे अधिष्ठात्रे तत्वज्ञान असलेल्या मार्क्सवादाच्या पाठिराख्यांनी 12 ते 16 मार्च,2013 रोजी चंदीगड येथे एका व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या व्याख्यानमालेचा विषय होता `जातीपश्न आणि मार्क्सवाद.' सृजनहिन ब्रम्होकम्युनिस्ट पजातीने भरविलेल्या या गर्भसंभव महोत्सवाची दखल घेण्याचे एरवी काही कारण नव्हते. मात्र या व्याख्यानमालेच्या आयोजक ब्रम्होकम्युनिस्टांनी त्यांचे दृष्टीकोनपत्र म्हणून सादर केलेल्या चोपडीमध्ये बुद्ध, जोतिराव फुले, पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या महापुरूषांबद्दल तसेच यामहापुरूषांच्या विचारांची पाठराखण करणाऱया लेखक विचारवंतांबद्दल अत्यंत असभ्य आरोप केले आहेत. या दृष्टीकोनपत्राद्वारे करण्यात आलेल्या आरोपांवरील स्पष्टीकरण देण्यासाठी व्याख्यानमालेच्या आयोजकांनी पसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पाचारण केले होते. तसेच या व्याख्यानमालेत उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातील पतिनिधी म्हणून रिपब्लिकन पँथर या (आंबेडकरवादी?) संघटनेला निमंत्रित केले होते. या संघटनेचे 1) विरा साथीदार 2) शरद गायकवाड 3)उत्तम जागिरदार 4)राजू कदम 5) स्वाती बिर्ला हे कार्यकर्ते या व्याख्यानमालेस उपस्थित होते. या व्याख्यानमालेत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी त्यांच्या स्वत:वर लावलेल्या आरोपांना उत्तरे दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लावलेल्या आरोपांविषयीही भाष्य केले. मात्र या पयत्नात ते पूर्णत अपयशी झाले असे जाणवले. त्यामुळे चेकाळलेल्या सृजनहिन ब्रम्होकम्युनिस्टांनी व्याख्यानमालेच्या नंतर आंबेडकरीस्ट पत्रकार पलाश बिस्वास, आंबेडकरीस्ट लेखक एच.एल.दुसाध, नागेश चौधरी, अनुप कुमार या सर्वांवर तोंडसुख घेणे सुरू ठेवले आहे. व्याख्यानमालेत स्वत:वरील आरोपांचे खंडन करताना डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी डॉ. आंबेडकरांसंबंधी केलेली काही विधाने आंबेडकरीस्ट जनतेच्या भावना दुखावणाऱया आहेत. त्यामुळे ब्रम्होकम्युनिस्टांनी सुरू केलेला दुष्पचार आणि स्वयंलुब्ध (नार्सिसिस्ट) दलित कम्युनिस्टांची मिथ्या धारणा यांचा परामर्श घेणे आवश्यक आहे.
पस्तुत व्याख्यानमालेच्यादृष्टीकोनपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. इतिहास, तत्वज्ञान,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इ. सर्व ज्ञानशाखाबाबत डॉ. आंबेडकरांचे विचार तथ्यहिन, उथळ,परस्परविरोधी आणि सर्वसाधारणपणे चुकीचे आहेत असा निष्कर्ष त्यात नोंदविण्यात आला आहे.डॉ. आंबेडकर एक संधीसाधू, सौदेबाज, स्वार्थी राजकारणी होते. अर्थशास्त्राच्या सर्वसाधारण नियमांचाही त्यांचा अभ्यास नव्हता. जातीनिर्मूलनाचा कोणताही कार्यकम त्यांच्याकडे नव्हता.त्यांची धर्मविषयक मते पुराणमतवादी होती. ते एक मध्यमवर्गीय (बूर्ज्वा) सुधारक होते.अशी अनेक द्वेषमुलक दूषणे देत `आंबेडकरवाद' नावाचे तत्वज्ञान किंवा विचारसरणी त्यांनाअमान्य असल्याचे नमूद केले आहे. या ब्रम्होकम्युनिस्टांचा पतिनिधी अभिनव सिन्हा हा तर `आंबेडकरवादी' हा शब्दच चूक आहे. ज्याला आंबेडकरवाद (Ambedkarism) म्हणता येईल, अशी कोणताही एकात्मिक विचारधारा, तत्वज्ञान, सिद्धांत इ. अस्तित्वात नाही. त्यामुळे आंबेडकरवादी (Ambedkarist)या ऐवजी आंबेडकरपंथीय (Ambedkarite)असा शब्दपयोग वापरावा असे सुचवितो. त्यांच्या मताशी सहमती दर्शवित डॉ. आनंद तेलतुंबडे हे सुद्धा आंबेडकरवाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा देतात. या पार्श्वभूमीवर खरेच आंबेडकरवाद असे ज्याला म्हणता येईल अशी विचारधारा अस्तित्वात आहे किंवा नाही याची तपासणी केली पाहिजे. तसेचआंबेडकरीस्ट आणि आंबेडकराईट या दोन संज्ञेमध्ये काय फरक आहे हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. वाद या मराठी शब्दाला इंग्रजीत ism हा पतिशब्द आहे. इज्म (ism) चा शब्दकोषातील अर्थ विशिष्ट परंपरा(practice), व्यवस्था (system), तत्वज्ञान (philosophy) असा आहे. मानवी अस्तित्वाचा विचार करणारा एक स्वतंत्र विचारव्यूह म्हणजे-ism होय. या विचारव्यूहाशी बांधिलकी मानणारे, पवर्तनकर्त्याने विशिष्ट पद्धतीने व्याकृत केलेल्या विशिष्ट कृती/पद्धतीचेअनुसरण करणारे लोक या अर्थाने हा पत्यय वापरला जातो. -ite या पत्ययाचा शब्दकोषातील अर्थ श्रद्धा ठेवणारा, भक्त, संपदायाचा अनुयायी असा आहे. विवेकबुद्धीचा वापर न करता अनुयायीत्व स्विकारणारे या अर्थाने हा पत्यय वापरला जातो. वरील विश्लेषण पाहिल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या जीवनाच्या सर्वस्पर्शी चिंतनाला एक वैश्विक तत्वज्ञान, मानवी अस्तित्वाचाविचार करणारा एक स्वतंत्र विचारव्यूह (ism) म्हणावे की, एका विशिष्ट समुहाच्या हितसंबंधाशी बांधलेला, व्यावहारिकपातळीवरील किया पतिकियावाद म्हणावे (ideology) यावर विचार होणे आवश्यक आहे.
आंबेडकरवाद म्हणजे एक स्वतंत्र सर्वस्पर्शी तत्वज्ञान आहे, अशी मांडणी यापूर्वी डॉ.डी.आर.जाटव यांनी अत्यंत ताकदीने केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आर्थिक व नितीविषयक विचारांचे विश्लेषण करुन जागतिक तत्वज्ञानांच्या विचारांशी तुलना करण्याचे महत्कार्य डॉ. डी.आर.जाटव यांनी केले. त्यानंतर डॉ. सदा कऱहाडे, डॉ. गंगाधर पानतावणे,डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. म.ना. वानखेडे, डॉ. यशवंत मनोहर, ताराचंद्र खांडेकर व इतर अनेक भारतीय विचारवंतांनी आंबेडकरवादाच्या विविध तत्वज्ञानात्मक पैलूची मांडणी करणारे लेखन केले आहे. विदेशी विचारवंतापैकी डॉ. गेल ऑम्वेट, एलिनॉर झेलिएट, किस्तोफर जेफेलेट,युजेन इर्श्चिक, मार्गरेट बार्नेट, ल्युडविग व्हॉन माईजेस इ. विचारवंतानीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर संशोधन करुन विविध पैलूंची तत्वज्ञानात्मक चिकित्सा केली आहे.या विचारवंतांनी आंबेडकरवाद नावाचा वैश्विक दृष्टीकोन बाळगणारा स्वतंत्र विचारव्यूह(Ambedkrism) आहे हे निर्विवादपणे सिद्ध केले आहे. मात्र मार्क्सवादी विचारवंतापैकी मे. पु.रेगे, दिपांकर गुप्ता, दि.के.बेडेकर, कॉ.बी.टी.रणदिवे, गं.बा.सरदार, सुधीर बेडेकेरइ. विचारवंतांनी आंबेडकरवाद नावाचे कोणतेही तत्वज्ञान नाही असा निर्वाळा दिला आहे.कॉ. शरद पाटील यांनी फुले आंबेडकरवाद नावाचे स्वतंत्र तत्वज्ञान आहे अशी मांडणी1980 नंतरच्या काळात केली. (मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद-1993) यासाठी त्यांनी पसिद्ध इटालियन विचारवंत अंतोनिओ ग्रॅम्सी यांच्या व्याख्येचा आधार घेतला आहे. ग्रॅम्सी म्हणतो`सर्वच माणसांचे काही ना काही तत्वज्ञान असते. पण दार्शनिक त्यालाच म्हणता येईल की,जो त्याच्या काळापर्यंतच्या विचारांचा विकास जोखू शकतो आणि एखादी समस्या सोडविण्यासाठी तत्पूर्वी झालेल्या सर्व पयत्नांनी ती जेथपर्यंत आणून सोडली तेथपासून ती तो हाती घेऊ शकतो.' ते पुढे म्हणतात, आंबेडकरांनी जातीचा पश्न आणखी पुढारलेल्या दार्शनिक अवस्थेपर्यंत आणून ठेवला म्हणून आंबेडकर हे केवळ विचारवंत नव्हते तर दार्शनिक होते. मी त्यांच्या तत्वज्ञानाला समाजवादी, अनित्यात्मक, बाह्यार्थवाद असे म्हणतो. (मार्क्सवाद व फुले आंबेडकरवाद पृ.188-189) मार्क्सवाद आणि फुले-आंबेडकरवाद यांचा संयोग घडवून नवे तत्वज्ञान मांडण्याच्या खटपटीतून त्यांनी आंबेडकरवाद हे एक स्वतंत्र तत्वज्ञान असल्याचे ठासून सांगितले. मात्र त्यानंतर आंबेडकरवाद नावाचे स्वतंत्र तत्वज्ञान नसून ती एक विचारसरणी आहे अशी कोलांटउडी मारली. (लोकशाही भांडवलदारी कांती आणि तीची समाजवादी पूर्ती-2009) विचारवंतामधील या मतभेदाचा विचार केल्यास सर्वच मार्क्सवादी पंडितांनी आंबेडकरवादे स्पष्टपणे नाकारल्याचे दिसते. याचे मुख्य कारण मार्क्सवादी पोथीनिष्ठा हेच आहे. जीवनातील सर्वच समस्यांची उत्तरे मार्क्सवादाने दिली आहेत. मार्क्सवाद वगळता इतर सर्व तत्वज्ञाने, विचारसरण्या भ्रांत आहेत. यामुळे अशा तत्वज्ञानाचे, विचारसरणीचे बाधन (Negation) करणे आवश्यक आहे अशी सर्वपंथीय मार्क्सवाद्यांची धारणा आहे. यामुळे आंबेडकरवाद सुद्धा भ्रांत आहे. म्हणून आंबेडकरवादाचे सुद्धा बाधन(Negation) करणे आवश्यक आहे. या धारणेतून मार्क्सवादी विद्वान आंबेडकरवादाचे अस्तित्व अमान्य करतात. डॉ. आनंद तेलतुंबडे हे सुद्धा मार्क्सवादी(त्यांच्या म्हणण्यानुसार ते वयाच्या 7 व्या वर्षी मार्क्सवादी झाले.) असल्यामुळे त्यांनाहीआंबेडकरवाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही असे वाटणे स्वाभाविक आहे.
आंबेडकरवादी(Ambedkarist) की आंबेडकरपंथीय (Ambedkarite)
भारतातील ब्रह्मोकम्युनिस्ट तसेच नवब्राह्मण्यवादी आंबेडकरवाद नावाचे तत्वज्ञान असल्याचे अमान्य करतात. यामुळे डॉ.आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱया परिवर्तनवाद्यांना आंबेडकरवादी(Ambedkarist) असे संबोधण्यास त्यांचा विरोध आहे. त्यांच्या मतानुसार डॉ. आंबडकर हे केवळ समाज सुधारक होते. त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याचेआकर्षण केवळ त्यांच्या जातीच्याच लोकांना असू शकते. त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱया अनुसूचित जातींच्या लोकांचा एक संपदाय तयार झाला आहे. त्यामुळे अशा लोकांना आंबेडकरपंथी (Ambedkarite -आंबेडकरांचे भक्त) असे नामाभिधान ते देतात. आंबेडकरवाद या नावाने समाजपरिवर्तनाचे स्वतंत्र तत्वज्ञान मान्यता पावणे हे रा. स्व. संघाच्या विचार न करणारा माणूस घडविण्याच्या योजनेला अत्यंत घातक आहे. व्यक्तीने विचार विसरुन जावे व केवळ भक्त बनावे, नामस्मरणात गुंग रहावे. भलेही मग ते रामाचे, साईचे, स्वामीचे, ख्रिस्ताचे, अल्लाचे, बुद्धाचे किंवाडॉ. आंबेडकरांचे नाव असो. यासाठी संघपरिवाराकडून निरंतर पयत्न केले जातात. आंबेडकरवाद हे तत्वज्ञान नाही तर संपदाय आहे. यामुळे आम्ही तुम्हाला आंबेडकरिस्ट नव्हे तर आंबेडकराईट म्हणू यामागेही हीच संघीय निती कार्यरत आहे. हे आपण ओळखले पाहिजे.
तत्वज्ञानआणि विचारसरणी यामधील फरक
आंबेडकरवाद नावाचे तत्वज्ञान अस्तित्वात नाही तर ती केवळ एक विचारसरणी आहे. या अपपचाराला हाणून पाडण्यासाठी तत्वज्ञान आणि विचारसरणी यामधील फरक माहित असणे आवश्यक आहे. भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास लिहिणारे सुरेन्दनाथ दासगुप्ता यांच्या मते वेदांमध्ये तत्वज्ञान या संकल्पनेचा शब्द सापडत नाही. बौध्द साहित्यामध्ये पहिल्यांदा तत्वज्ञानासाठी `दिठ्ठी' हा शब्द वापरण्यात आला. बुध्दापेक्षा वेगळे मत असलेल्या 62 पकारच्या दिठ्ठीचे वर्णन बुध्दाने ब्रह्मजाल सुत्तामध्ये केले आहे व या `दिठ्ठी' मिथ्या (मानवी कल्याणास अनुपयुक्त)असल्याचे जाहीर केले. (संस्कृत शब्द दृष्टी या धातूपासून दर्शन हा शब्द पचलित झाला.) उपनिषदांमधील वैशेषिक सूत्र 9.2.13 मध्ये दर्शन हा शब्द तत्वज्ञान या अर्थाने वापरण्यात आला आहे. वैशेषिक सूत्राचा कर्ता कणाद ऊर्प औलुक्य ह्याचा काळ बुध्दानंतरच्या समजण्यात येतो. त्यामुळे तत्वज्ञानाला पर्यायवाची शब्द `दर्शन' हा बुध्दोत्तर काळात पचलित झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणतीही समाजकांती होण्यापूर्वी वैचारिक कांती होणे आवश्यक असते. वैचारिक कांतीची दिशा देणारे ज्ञान किंवा दर्शन म्हणजेच तत्वज्ञान होय. आपली तत्वज्ञानाची कल्पना स्पष्ट करताना डॉ. आंबेडकरम्हणतात, 'I am using the word philosophy in its original sense which was two fold. It meant teaching as it did when people spoke of the philosophy of Socrates or the philosophy of Plato. In another sense it meant reason used in passing judgements upon things and events.' (BAWS.Vol.3 pg.5) कोणत्याही वस्तू किंवा घटना यांच्याविषयी निष्कर्षापत येतांना सूक्ष्म विवेकबुद्धीचा वापर करणे म्हणजे तत्वज्ञानात्मक दृष्टीकोण असे डॉ. आंबेडकर स्पष्ट करतात. कांती ही तत्वज्ञानाची जननी असते असे त्यांचे मत होते.तत्वज्ञानाचे कार्य सृष्टीच्या उगमाचे विश्लेषण करणे नसून विश्वाची पुर्नरचना करणे आहे असे त्यांनी निक्षुण सांगितले आहे. दोन भिन्न मतांच्या पवक्यामध्ये जो वैचारिक संघर्ष होतो. त्यात ज्या मतांचा विजय होतो ती मते समाजाकडून स्वीकारली जातात. त्या मताचा पचार- पसार केला जातो व त्यानुसार शासनसंस्था व समाजव्यवस्था कार्य करते. बाबासाहेबांनी यास कांती व पतिकांती असे नाव दिले आहे. बुध्दाच्या काळात लोकायताचे भौतिकवादी दर्शन वगळता इतर सर्व दर्शने आत्म्याचे अस्तित्व मान्य करणारी होती. आत्मा हा नित्य व अपरिवर्तनीय असल्याने समाजमनसुध्दा आहे ती स्थिती नित्य व अपरिवर्तनीय आहे असे मानणारे बनले होते.
बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व अमान्य केले व संपूर्ण विश्व अनित्य म्हणजेच परिवर्तनीय असल्याचे पतिपादन केले. विश्व जर परिवर्तनीय आहे तर, विश्वातील सर्वच वस्तू परिवर्तनीय आहेत.त्यामुळे वर्णव्यवस्थासुध्दा परिवर्तनीय आहे ही मानसिकता बुध्दाच्या तत्वज्ञानाने पस्थापित केली. बुध्दाने त्यांच्या काळात वर्णाश्रमधर्म समर्थन व वर्णाश्रमधर्म विरोध या मुख्य शत्रुभावी विरोधात वर्णाश्रमविरोधाची बाजू घेतली.वर्णाश्रमाचा विरोध करणाऱया दास, निम्म कारागीर व हीन दर्जाची कामे करणाऱया जाती यांचीबाजू घेतली. मानवी विचार पकियेचे विश्लेषण करुन मानवी उत्कर्षाला पोषक व रोधक वर्तणूकीचे वर्गीकरण केले. उत्पादक कामात गुंतलेल्या दासांना रोखीने वेतन देण्याविषयी, त्यांच्याकडून काम करवून घेण्यासाठी त्यांना पाथमिक सोईसुविधा देण्याविषयी समाजजागृती केली. बुध्दाचा एकंदरीत विचार सुसूत्र, सार्वकालीक आणि सार्वत्रिकरित्या लागू पडेल असा आहे. त्यामुळे या विचारास तत्वज्ञान अशी संज्ञा पाप्त होते. याउलट बुध्दाच्या समकालीन असलेल्या 1.पूर्णकाश्यप-अकियावाद 2. मक्खली गोसाल - नियतिवाद किंवा सर्वकष दैववाद, 3.अजित केसकंबली- उच्छेदवाद,4. पकुध कच्चाण- अकृततावाद, 5.संजय बेलठ्ठीपुत्त- अनेकान्तवादी /अनिश्चिततावाद (दर्शन-दिग्दर्शन,राहूल सांकृत्यायन)या विचारधारांचे पवर्तक पत्यक्ष सामाजिक संघर्षातून अलिप्त होते.पत्यक्षापत्यक्षपणे वर्णश्रमधर्मवाद्याच्या बाजूने होते. यामुळे यांचे विचार त्यांच्या विशिष्ट अनुयायापुरते मर्यादित राहीले. स्थलकाल सापेक्षता ओलांडून विश्व आणि मानवी विचार व व्यवहार यास सार्वत्रिकरित्या लागू पडतील असे सुसूत्र नियम, विश्लेषण, tark र्त्यांच्या विचारात दिसून येत नाहीत. त्यामुळे या विचारधारा ना समाजकांतीसाठी उपयुक्त ठरल्या ना अकॅडमिक पातळीवर त्यांच्या विचारांना मान्यता मिळाली. उपरोक्त विवेचनावरुन आपणास निष्कर्ष काढता येईल की, विश्वाचे गतिनियम व मानवी जीवन यांचा परस्परसंबध विषद करुन सूसूत्र, सार्वत्रिकरित्या सर्व काळात लागू होऊ शकेल, पत्यक्ष कृतीत आणता येऊ शकेल असा विचारव्यूह म्हणजे तत्वज्ञान आणि एखाद्या विशिष्ट गटाच्या, समूहाच्या, वर्गाच्या हितसंबधांशी निगडीत अर्धव्यावहारिक अर्ध वैचारिक, मानवी विचार व व्यवहार यावर दिर्घगामी परिणाम न करणारा डावपेचात्मक विचार म्हणजे विचारसरणी.
पाश्चिमात्य तसेच इस्लामिक तत्वज्ञानाच्या बाबतीतही हे निकर्ष लावल्यास सॉकटिस, ऍरिस्टॉटल, प्लॅटो, मॉझेस, ख्रिस्त, पैंगबर, बेकल,देकान,स्पिनॉझा, व्हॉलेअर, रुसो, कान्ट, हेगेल, फायरबॉरव, कार्लमार्क्स, जॉन ड्युई इ. विचारवंत दर्शकांनी सार्वत्रिक स्वरुपाचे सुसूत्र नियम, तर्प तत्वे पस्थापित केली आहेत. त्यामुळे त्यांचे स्थान केवळ सुधारकांचे न राहता स्वतंत्र तत्ववेत्यांचे आहे.
तत्वज्ञानी डॉ. आंबेडकर
आंबेडकरवाद म्हणजे नेमके काय हे समजून येण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सूत्रबध्द मांडणी आवश्यक आहे. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या दृष्टीने आदर्श समाजकोणता हे `जातीसंस्थेचा उच्छेद (Annihilation of Caste) या आपल्या पसिद्ध भाषणात नमूद केला आहे. ते म्हणतात My Ideal would be a society based on Liberty equality fraternity.... An Ideal Society should be mobile, should be full of channels for conveying a change taking place on one part to other part. In an ideal society, There should be many interests conscioulsy communicated and shared. There should be varied and free points of contact with other modes for association. In other words there must be social endosmosis..... it is essentially an attitude of respect and reverence towords fellow men. (Vol. I, pg57) वरील पमाणे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर आधारित समाज पत्यक्षात निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय, सामाजिक,आर्थिक व धार्मिक जीवनाची उभारणी खाली तत्वांच्या आधारे केल्याचे आपणास दिसेल.
1) परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. व्यक्ति आणि समाज त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार समाजाच्या नैतिक मूल्यात बदल करणे आवश्यक आहे.
2) ईश्वर,आत्मा, पुर्नजन्म यावर श्रद्धा अमान्य.
3) स्वातंत्र्य,समता, न्याय आणि बंधुभाव यावर आधारित समाजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट.
4) समान न्याय हा जन्मसिद्ध अधिकार. संधीची समानता सार्वत्रिक असावी मात्र संधीवंचितांना उत्पादनसाधनाचे वाटप करण्यासाठी अग्रकम देण्यात यावा.
5) स्वयंविकास ही मानवी जीवनाची सर्वोच्च सार्थकता आहे.
6) जुनी मूल्येआपोआप बदलत नसतात. ती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
7) दास्यता,भय आणि भूक यापासून मुक्ती देणे हे राज्याचे कर्तव्य
8) मानवीमूल्यांना बाधा पोहचविणारी वर्तणूक कोणत्याही परिस्थितीत करण्यास पतिबंध.
9) एका माणसाने दुसऱया माणसाचे किंवा एका वर्गाने दुसऱया वर्गाचे शोषण करणे निषिद्ध.
10) संसदीय लोकशाही पद्धतीने चालणारी राज्यपद्धती सर्वोत्तम.
11) बौद्ध जीवनमार्ग हा सर्वश्रेष्ठ जीवनमार्ग. या मार्गाचा वापर करुनच रक्तपात विरहित मार्गाने लोकशाही कांती चिरकाल टिकविता येईल.
ही संपूर्ण तत्वे एक विशाल विश्वदृष्टीकोण बाळगणारी आहेत. त्याचपमाणे लोकशाही कांतीचे तत्वज्ञान विषद करणारी आहेत. हा विश्वदृष्टीकोण डॉ. आंबेडकरांनी सुसंघटीत केलाआहे. म्हणून या विश्वदृष्टीकोणाला `आंबेडकरवाद' नावाचे स्वतंत्र तत्वज्ञान संबोधलेपाहिजे.
सुनील खोबरागडे
No comments:
Post a Comment